सरपंच सौ.वणिता कंधारकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

सरपंच सौ.वणिता प्रशांत कंधारकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर 


शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथील सरपंच तथा हिंगोली सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष  सौ. वणिता प्रशांत कंधारकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंदर्भात शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी पत्र पाठवून दिले आहे.
 कोव्हीड- 19 दोन वर्षाच्या कार्यकाळात मराठवाड्यातील सरपंचांनी केलेल्या कामाची दखल घेत  मराठवाड्यातील सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील धांडेगाव येथील शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आले.आडगावच्या सरपंच सौ. वणिता प्रशांत कंधारकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार तानाजीराव मुटकुळे, भाजपा युवा मोर्चा प्राभारी ( लातूर) शिवाजी मुटकुळे, माजी. जिल्हा परिषद सदस्य अँड.अमोल जाधव, प्रशांत कंधारकर, आडगाव ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم