प्लॅन्ट वरील विद्युत ट्रान्सफार्मर मधील तांब्याचे तार चोरनारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद महाराष्ट्रातील अनेक गुन्हे उघड होन्याची शक्यता

प्लॅन्ट वरील विद्युत ट्रान्सफार्मर मधील तांब्याचे तार चोरनारी आंतरजिल्हा टोळी जेरबंध ( स्था . गु.शा. हिंगोलीची कार्यवाही महाराष्ट्रातील अनेक गुन्हे उघड होन्याची शक्यता ) दि . २१/०३/२०२२ रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हत्वा नाईक येथे शेतशिवारामध्ये ४८ एकर जमिनीवर सौरउर्जा पॉवर प्लॅटचे बांधकाम चालू आहे . सदर प्लॅटवर सौरउर्जा निर्मान करन्यासाठी मोठे विद्युत ट्रान्सफार्मर आनले होते . दि . २१/०३/२०२२ रोजी सौरउर्जा प्लॅट वरील विदयुत मॅनेजर यांनी पो स्टे , सेनगाव येथे फिर्याद दिली की सदर पॉवर प्लॅन्ट वरील ट्रान्सफार्मर मधील ऑईल अॅ . २६०० लिटर व ताव्याचे तार अं . १५०० किलो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून  तकार दिल्यावरून पोलीस स्टेशन सेनगाव येथे गुरन ७२ / २२ कलम ३७ ९ , ४२७ भादवी अन्वये गुन्हा दाखल होता . सदर गुन्हयाच्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री . एम . राकेश कलासागर साहेब यांनी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री . उदय खंडेराय यांना गुन्हा उपइकिस आणणेकरीता योग्य त्या सुचना देवुन एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते .. मा . पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनात स्वागुशा येथील तपास पथकाने सदर प्रकारचे महाराष्ट्रात झालेल्या इतर गुन्हयांचा माहीती घेवुन तसेच गोपनीय यंत्रणा व सायबर तंत्रज्ञान यांचे सहायाने जलद गतीने तपास करून सदर गुन्हा हा एका सुनियोजीत टोळीने केल्याबाबत पुरावा हस्तगत करून नमुदचा गुन्हा आरोपी नामे- १ ) सर्जेराव किशन भोसले वय ४५ वर्ष २ ) दिपक सर्जेराव भोसले वय २१ वर्ष दोन्ही रा . दिघोळ तांडा सोनपेठ जि.परभणी ३ ) अनुरथ तातेराव हरगावकर वय ३० वर्ष रा . बोरखेडी ता . सेनगाव जि.हिंगोली ४ ) अजमत अली मजहर अली वय ४० वर्ष व्यव- भंगार व्यापारी रा .. बिलाल मशीदी जवळ परभणी ५ ) बंडु उत्तम वायफळकर वय ३५ वर्ष ६ ) अर्जुन उत्तम वायफळकर वय २५ वर्ष दोन्ही रा . रेणकापुर शिरसी ता . जि . परभणी ७ ) व्यंकटी किशन भोसले वय ३० वर्ष रा . दिघोळ तांडा ता . सोनपेठ जि.परभणी ८ ) पिकअप वाहन मालक इरशाद रा . नांदेड ९ ) पिकप वाहन चालक रा . परभणी यांनी केल्याचे निष्पन्न करून यातील आरोपी क . १ ते ४ यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयातील चोरी केलेले ऑइल त्याच ठिकाणी सोडून दिले व गुन्हयातील चोरलेले कॉपरचे वायर आरोपी क . ४ यांना विक्री करून आलेले पैसे आपसात वाटुन घेतल्याचे निष्पन्न झाले . तसेच आरोपींना ईतर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी यापूर्वी हिंगोली जिल्हयातील पो.स्टे . गोरेगाव गुरनं . २७/२०२० कलम ३७ ९ भादवी व पो.स्टे . बाळापुर येथील गुरनं . १३५/२२ कलम ३७ ९ भादवी असे हिंगोली जिल्हयात ०३ गुन्हे केल्याचे व बुलढाणा जिल्हयातील पो.स्टे . खामगाव ग्रामीण हददीतही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे . आरोपी क . १ ते ४ यांचे कडुन गुन्हयातील कॉपरचे वायर विक्री करून मिळवलेले नगदी ५,८०,००० रु . तसेच गुन्हयात वापरलेले २ मोटार सायकल किं . १,४०,००० रू . व गुन्हया करण्यासाठी वापरलेले ४ मोबाईल किं .६०,००० रू . असा एकुन ७,८०,००० रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे . सदर आरोपीतांकडुन महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातील गुन्हे उघड होण्याची व आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे . सदर कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक श्री . एम . राकेश कलासागर अपर पोलीस अधीक्षक श्री . यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. उदय खंडेराय , सपोनि सुनिल गोपीनवार , राजेश मलपिलु , पोउपनि शिवसांब घेवारे भाग्यश्री कांबळे , ( सायबर सेल ) , पोलीस अंमलदार , बालाजी बोके , संभाजी लेकुळे , विठठल कोळेकर , भगवान आडे , शंकर ढोबरे , विठठल काळे , तुशार ठाकरे , सुमित टाले , इरफान पठाण यांनी केली आहे 

Post a Comment

أحدث أقدم