*आ. संतोष बांगर यांच्या प्रयत्नांना मोठे यश....!

*आ. संतोष बांगरयांच्या प्रयत्नांना यश

 *कळमनुरी तालुक्यात मौजे कामठा, येलकी, जरोडा, डोंगरगाव पूल परिसरात तब्बल 224 एकर वर कळमनुरी जि. हिंगोली एम. आय. डी. सी. च्या विस्तारास मंजुरी.

*परिसरातील नागरिकांना रोजगार मिळणार असल्याने नागरिकांनी केला आनंद व्यक्त


हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर  यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून कळमनुरी जि हिंगोली येथील एम. आय. डी. सी. ची जागा अपुरी पडत असल्याने वाढीव क्षेत्रासाठी कामठा, येलकी, जरोडा व डोंगरगाव पूल परिसरातील 113.41 हे.आर.खाजगी व 111.14 हे.आर.सरकारी जमिनीवर एम.आय.डी. सी. च्या विस्तारास मंजुरी मिळाली आहे*.
      *सदर ठिकाणी एम. आय. डी. सी. उभी राहणार असल्याने कृषी आधारित उद्योग व इतर उद्योगांना जागेची उपलब्धता होऊन परिसरात उद्योग वाढीस चालना मिळणार असून अनेक बेरोजगार युवकांना येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच आज पर्यंत अनेक आमदार, खासदार निवडून येऊनही एमआयडीसीसाठी व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन हाताला काम मिळण्यासाठी एकाही नेत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न केले नाहीत परंतु 24 तास सर्वसामान्यांचा विचार करणारे लोकनेते आमदार संतोष बांगरयांच्या प्रयत्नाने कळमनुरी तालुक्यात एम. आय. डी. सी. उभी राहत असल्याने त्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातून शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी आमदार बांगर यांच्या कार्याचे मनातून कौतुक करून आभार मानले आहेत*

Post a Comment

أحدث أقدم