गोरेगाव पोलीस ठाण्यात रमजान ईद निमित्त शांतता समितीची बैठक,रोजा इफ्तार पार्टी संपन्न
रमजान ईद निमित्त गोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात सण उत्सव शांततेत साजरे करुन कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात दि.2 मे सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन पोलीसातर्फे करण्यात आले होते तसेच रमजान मुबारक महिन्या निमित्त मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी सुरवातीला शांतता समितीच्या बैठकीत गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रिदेवी पाटील यांनी जातीय सलोखा कायम रहावा यासाठी सर्वांनी एकत्र येत सन उत्सव शांततेत साजरे कराव अस मोलाचं मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून संदीप राजपुरे अप्पर तहसीलदार गोरेगाव, नायब तहसीलदार सुनील कावरखे,पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव, गोरेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच विश्वनाथ कावरखे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पाटील,मुस्तफा सय्यद,आहेमद सय्यद ,सय्यद सलीम,मोहीदीन खा पठाण,दौलत सय्यद, गोरेगाव येथील जामा मस्जिदचे सदर सय्यद सलीम,मदीना मस्जिद तलाबकट्टा मौलवी साहेबुलहक्क , गोरेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक सय्यद बुढण,शेख रशीद,तुराब भाई, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप पाटील, सुनिल पाटील,जगनपाटील,संदीप पाटील,उमर शेख, पोलीस नाईक राहुल गोटरे,तसेच पोलीस कर्मचारी, आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق