पोलीस जमादार शेख शकील यांना शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

पोलीस जमादार  शेख शकील  यांना शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

हिंगोली प्रतिनिधी 
2मे2022
महाराष्ट्र 24 न्यूज 


हिंगोली गुन्हे शाखेचे   पोलीस जमादार  शेख शकील  यांना पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते दरम्यान 

1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले 

शेख शकील यांनी गारमाळ खून प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक केली 
कोरोना काळात  बाहेरगावच्या प्रवाशांना  त्यांच्या निवासस्थानी रवाना केले 
पोलीस कोम्बिंग ऑपरेशन मध्ये गंगवार  कडून तलवारी हत्यारे अवजारे आरोपीकडून जप्त केले 
तसेच शेख यांनी सांगितले मला आतापर्यंत पोलीस दलात  उत्कृष्ट काम केल्याबद्दल 192 पोलीस रिवार्ड तसेच अनेक प्रमाणपत्रासह  पोलीस महानिरीक्षक यांनी दहा हजार रुपये रोख बक्षीस देऊन   सन्मान करण्यात आला

तसेच रात्रीचे गरस्त घालत  असताना अनेक चोरट्यांना रंगेहात पकडून गजाआड केले 
 हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना जातीय दंगली उसळल्या होत्या 
त्यामध्ये मी जातीय सलोखा राखून  ठेवला व 
हाणामारीचे प्रकरण तात्काळ घटनास्थळी जाऊन थांबवले 

 पोलीस दलाच्या वतीने  प्रमाणपत्र  देऊन गौरविण्यात आले होते अशा उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह  जाहीर करण्यात आले 

1 मे रोजी हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री वर्षा गायकवाड पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले 

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे   सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख  उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड  गुन्हे शाखेचे उदयन खंडेराय 
पोलीस निरीक्षक पंडित कचवे 

यांच्यासह मोठ्या प्रमाणात अधिकारी उपस्थित होते 

पोलीस  जमादार शकील  यांचे महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल  

 शेख शकील यांचे पोलिस दलात कौतुक होत आहे

Post a Comment

أحدث أقدم