आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र 24 न्यूज
प्रतिनिधी21जून2022
हिंगोली येथील संत नामदेव कवायत पोलीस मैदान येथे आज सकाळी सहा वाजता योग महोत्सव निमित्त 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, एस आर पी एफ चे समादेशक संजय गिल, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे, आरटीओ आनंता जोशी, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, क्रिडाधिकारी संजय बेत्तीवार, नप.चे उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, डिपी शिंदे, योग मार्गदर्शक दत्तराव लेकुळे, विठ्ठल सोळंके, रत्नाकर महाजन, रक्षा बगडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.
إرسال تعليق