बेकायदेशीररीत्या शस्त्र तलवार बाळगणा-यांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखाची कार्यवाही
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे आदेशाने हिंगोली जिल्हयात अवैध्द धंद्यांविरूध्द व बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणा-यांविरूध्द कार्यवाहीची "विशेष मोहिम” राबवीण्यात येत असुन,
आज दिनांक- २१/०६/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने पेट्रोलींग दरम्याण मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीतील गाडीपुरा परीसरातील रूपेश मुदीराज यास बेकायदेशीररीत्या शस्त्र तलवार बाळगतांना मिळुन आल्याने त्यास ०२ शस्त्रासह ताब्यात घेवून त्याचेविरूध्द पो.स्टे. हिंगोली शहर येथे शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री उदय खंडेराय, सपोनि. श्री राजेश मलपिलु, पोह शंकर जाधव, पोह शेख शकील, कारवाईत सहभाग घेतला होता
إرسال تعليق