शाळा महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शाळा महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन 

हिंगोली  प्रतिनिधी 
हिंगोली शहर पोलिस स्टेशन व सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. 
जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहर पोलिस स्टेशनच्यावतीने दयानंद एज्युकेशन सोसायटी, हिंगोली द्वारा संचलित सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश भारुका हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सहायक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, अनिलकुमार भारुका, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, मोटर वाहन निरीक्षक जगदिश माने, सहायक मोटर वाहन निरीक्षक पवन वानखेडे, विद्यालयाचे प्राचार्य सी.के.देशपांडे हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त यतिश देशमुख, जगदिश माने व पंडित कच्छवे यांनी वर्ग ६ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनींना सामाजिक सुरक्षतेचा भाग असुन समाजातील प्रत्येक घटक नियमित वापर करत असतो. विद्यार्थ्यांना रस्त्याचा वापर करताना नियमित रस्त्याच्या डाव्या बाजुचा वापर करावा व सायकल चालवत असताना डाव्या बाजुचा वापर करावा रस्त्यावरुन वडळयापुर्वी डावीकडे वाहन येत नाही याची खात्री करुन मगच रस्ता ओलांडावा. वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करु नये. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  एन.टी.शिंदे यांनी तर आभार एम.एस.देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थीं व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. 

Post a Comment

أحدث أقدم