वसमत शहरात शांततेसाठी पोलिसांचे प्रमुख मार्गाने पथसंचलन

वसमत शहरात शांततेसाठी पोलिसांचे प्रमुख मार्गाने   पथसंचलन

हिंगोली  प्रतिनिधी
23जून2022
 राज्यात होणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वसमतमध्ये त्याचे पडसाद उमटू नयेत. कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. शहराच्या मुख्य रस्त्यावरून हे पथसंचलन करण्यात आले. दरम्यान, शहरात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही तैनात केली.
राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथी आणि घटनांमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. वसमतमध्ये शिवसेनेचे मोठे प्रस्थ आहे. त्या पार्श्वभूमीवर या घटनांचा परिणाम
उमटू शकतो. वसमत शहरातून पथसंचलन करून शांततेचे आवाहन पोलिसांनी केले. तसेच राज्य राखीव दलाची एक तुकड़ी तैनात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आला आहे. पथसंचलनमध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सपोनि गजानन बोराटे, पोलीस निरीक्षक प्रतिभा शेटे, बाळासाहेब खारडे, कृष्णा चव्हाण, हेंद्रे, दिलीप पोले, शेख हाकीम, नय्यर यांच्यासह पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदींचा समावेश होता.

Post a Comment

أحدث أقدم