आ.संतोष बांगर यांची राज्यभरातील 102 रुग्णवाहिका चालकांनी हिंगोली येथे भेट घेऊन दिले विविध मागण्यांचे निवेदन...!
*राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे 102 रुग्णवाहिका चालकांच्या समस्या मांडून सर्व चालकांना न्याय मिळवून देणार*
*- आ.संतोष बांगर*
*हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांची राज्यभरातील 102 रुग्णवाहिका चालकांनी हिंगोली येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.*
यावेळी *बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की 102 रुग्णवाहिका चालकांना नियमाप्रमाणे 19 हजार 900 रुपये वेतन मिळाले पाहिजे तसेच कंत्राटी पध्दत बंद करून 102 रुग्णवाहिका चालकांचे n r h m अंतर्गत नियोजन करावे तसेच सर्व चालकांचे मासिक वेतन हे वेळेवर अदा करावे या व इतर मागण्यांसाठी एक महिन्याच्या आत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे 102 रुग्णवाहिका चालकांच्या समस्या मांडून सर्व चालकांना न्याय मिळवून देणार असल्याचे आमदार बांगर यांनी यावेळी सांगितले.*
यावेळी *संपूर्ण राज्यभरातून 102 रुग्णवाहिका चालक हे मोठ्या आशेने आपल्याला न्याय मिळेल म्हणून आमदार बांगर यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आले असता त्यांनी आमदार बांगर हे नेहमीच गोरगरीब कष्टकरी जनता व कर्मचारी लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात व कष्टकरी लोकांसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेण्याची गरज पडली तर कायदा हातात घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत म्हणून आम्ही राज्यभरातून आमची कैफियत मांडण्यासाठी आमदार संतोष बांगर साहेब यांच्याकडे आलो अशी भावना उपस्थित 102 रुग्णवाहिका चालकांनी व्यक्त केली.*
यावेळी *आरोग्य विभागाचे आयुक्त नितीन आंबडकर यांना आमदार संतोष बांगर यांनी दूरध्वनी लावला असता त्यांनी तो उचलला नाही आणि काय काम आहे ते मेसेज द्वारे सांगा असा मेसेज केला असता आमदार बांगर हे चांगलेच संतापले आणि अश्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणावेच लागेल अशी भावना व्यक्त केली.*
*नंतर तासाभराने आयुक्त महाशय यांनी आमदार संतोष बांगर यांनी कॉल केला असता आमदार बांगर यांनी आयुक्त श्री नितिन आंबाडेकर यांना चांगलेच फैलावर घेतले आणि 102 रुग्णवाहिका चालकांना शासन नियमाप्रमाणे 19900 पगार हा मिळाला पाहिजे आणि जो कोणी कंत्राटदार त्यांना मनमानी प्रमाणे 7 हजार, 8 हजार पगार देऊन बोळवण करीत आहेत अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आमदार बांगर यांनी आयुक्त साहेबांना यावेळी दिले.*
यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,रामजी नागरे, पंढरी मगर, नितीन होकर्णे, सचिन पवार,102 रुग्णवाहिका चालक शरद देवरे हिंगोली, पिंटू गडदे कळमनुरी, मनोज इंगडे चंद्रपूर, आनंद वाघ गडचिरोली, गफार शेख बुलढाणा, नादर शेख नांदेड, अमन पठाण यवतमाळ, श्रीराम भंडारा, अतिक भाई वाशिम, उमाकांत शेंडे नागपूर, रघुनाथ भाऊ बीड, तुकाराम भाऊ परभणी, लोकेश बारंगे वर्धा, अनुकूल ठाकरे अकोला, ज्ञानेश्वर जालना यांच्यासह 29 जिल्ह्यातून आलेले 102 रुग्णवाहिका वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते
إرسال تعليق