आसोला फाटा येथे चोरट्यांचा धुमाकूळ ; बँक फोडण्याचा प्रयत्न...!
औंढा नागनाथ/- तालुक्यातील आसोला पाटील जवळ असलेल्या भारतीय स्टेट बँकेत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र मुख्य तिजोरी फुटलीच नाही यामुळे चोरट्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला पाटी जवळ भारतीय स्टेट बँकेची शाखा आ.हे शनिवार दि. 20 आॅगस्ट रोजी सायंकाळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी काम बंद करून व बँकेचे दार लावून घरी गेले होते.
रविवारी दि. 21 ऑगस्ट रोजी बँकेला सुट्टी असल्याने तिकडे कोणीही फिरकले नाही त्यानंतर आज सोमवार दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता बँकेचे कर्मचारी बँकेत आले असताना बँकेच्या पाठीमागील कुलूप उघडलेली दिसले. त्यामुळे बँकेत चोरी झाल्याची लक्षात येऊन त्यांनी तातडीने हट्टा पोलिसांना या संदर्भात माहिती दिली
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, हट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक संदीप तावडे , जमादार भुजंग कोकरे यांच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी बँकेची पाहणी केली असता बँकेच्या मुख्य तिजोरीत कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याची दिसून आले. तिजोरी न फुटल्या मुळे चोरट्यांनी पळ काढण्याचे बँकेच्या तिजोरी असलेले पाच लाख रुपये व सुमारे 60 लाख रुपये किमतीचे सोने सुरक्षित राहिले आहे याप्रकरणी बँकेचे कर्मचारी सुधाकर सीलबंदे यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात सोमवार दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक तावडे पुढील तपास करीत आहेत.
إرسال تعليق