हिंगोली पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी मागील १० वर्षातील ४१९ पैकी १९२ मिस्सींग प्रकरणे निकाली

विशेष मोहीमेत हिंगोली पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी मागील १० वर्षातील प्रलंबित ४१९ पैकी १९२ मिस्सींग प्रकरणे निकाली काढले

४५३ पैकी २०८ व्यक्तींचा शोध घेण्यात पोलीसांना यश 

मा. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर   यांचे आदेशाने हिंगोली जिल्हा पोलीसांनी सर्व १३ पोलीस स्टेशन अंतर्गत सन २०१२ ते माहे जुलै २०२२ पावेतो मागील १० 
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर 

वर्षात प्रलंबित हरवलेले इसम मिस्सींग प्रकरण शोध घेणेबाबत १० दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली होती. जिल्हयातील प्रलंबित मिस्सींग संख्या ही जास्त होती. सदर विशेष मोहीमेची जबाबदारी नोडल ऑफीसर म्हणुन स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राजेश मलपिलु यांचेकडे देण्यात आली होती
नोडल ऑफिसर  राजेश मलपिल्लू

 सर्व पोलीस स्टेशन मधुन मागील १० वर्षाचे मिस्सींग अभिलेखाची सविस्तर पडताळणी करण्यात आली त्यात मागील १० वर्षात एकुण ४१९ मिस्सींग प्रकरणे प्रलंबित होती. त्यात एकुण ४५३ इसमांची संख्या ज्यात २४१ महीला तर २१२ पुरूष अशी संख्या होती. जिल्हयातील सर्व १३ पोलीस स्टेशन अंतर्गत १० दिवस विशेष मोहीमेत मा.पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे, श्री. किशोर कांबळे यांचे मार्गदर्शनात जिल्हयातील १३ हि ठाण्यातील प्रभारी अधिकारी व त्यांचे अधिनस्त अमलदारांनी मोहीमेत विशेष प्रयत्न व कामगीरी करून एकुण प्रलंबित ४१९ पैकी १९२ मिस्सींग प्रकरणे निकाली काढले त्यात एकुण २०८ इसम ज्यात महीला १२१ व पुरूष ८७ शोधण्यात हिंगोली पोलीसांना यश मिळाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم