नास्ता-पाण्यासाठी हॉटेलवर आलेल्या महिलेचा विनयभंग दोन आरोपी अटक

नास्ता-पाण्यासाठी हॉटेलवर आलेल्या महिलेचा विनयभंग दोन आरोपी अटक

महाराष्ट्र 24 न्यूज
20 ऑगस्ट 2022

हिंगोली : औंढा नागनाथ येथे एका हॉटेलवर नाश्तापाण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून पतीचे डोके फोडले. ही घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी १२.२० च्या सुमारास घडली. या प्रकरणी हॉटेलचालकाविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील पिंजर (ता. बार्शी टाकळी) येथील एक कुटुंबीय २० ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ येथे आले होते. यावेळी हे कुटुंबीय एका हॉटेलमध्ये नाश्तापाण्यासाठी गेले. नाश्तापाणी झाल्यानंतर पैसे देण्या- घेण्याच्या कारणावरून चालकाने पीडित महिलेच्या पतीच्या डोक्यात एका वस्तूने मारहाण केली. त्यानंतर एकाने महिलेचा विनयभंग


दोन आरोपी चा  पाठलाग करून केले जेरबंद 
यापूर्वीही हॉटेल चालक अनेक भाविकांना चड्या दराने हॉटेलमधील खाण्याचे पदार्थ विकत असल्याचे भाविकांनी सांगितले
उर्वरित आरोपीला लवकरच  अटक करू
असे ठाणेदार झुंजारे यांनी सांगितले

केला. शिवाय इतरांनी पीडित महिलेच्या पती, सासरा व सासूस थापडाबुक्क्यांनी मारहाण केली. या हॉटेल प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अक्षय अशोक भांडे, अमोल अशोक भांडे (रा. वासुदेव गल्ली, औंढा) व इतरांविरुद्ध औंढा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
वरील प्रकरणी दोन्ही आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपीचा  शोध सुरू आहे असे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم