वसमत पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश उत्सव संबंधाने जमाव नियंत्रण प्रात्यक्षीक सराव

वसमत  पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश उत्सव संबंधाने जमाव नियंत्रण प्रात्यक्षीक सराव

महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री निसार तांबोळी सर यांनी दि. 26.08.2022 रोजी पो. स्टे वसमत शहर येथे घेण्यात आलेल्या मिटींग मध्ये गणेश उत्सव संबंधाने सुचना देवून पो.स्टे. कर्मचारी व अधिकारी यांची जमाव नियंत्रण प्रत्येक्षीक सराव घेणे बाबत सुचना दिल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक  यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली  दि. 28.08.2022 रोजी सकाळी 08.00 वाजता जमाव नियंत्रण प्रात्यक्षीक सराव जिल्हा परीषद मैदार वसमत येथे आयोजन केले सदर सराव घेण्यासाठी पोलीस मुख्यालय हिंगोली येथील जिल्हा कवायत निर्देशक डि.डि.आय निलेश मंगळुरकर हे आले.
सदर जमाव नियंत्रण प्रात्यक्षीक सराव करीता मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री किशोक कांबळे सर, हे हजर होते त्यांचे मार्गदर्शनात आम्ही पो.नि. चंद्रशेखर कदम, पोउपनि खार्डे व महिला पोउपनि प्रतिमा शेटे मॅडम व एकुण 27 कर्मचारी असे प्रात्यक्षीक साठी हजर सहभाग घेतला होता

जिल्हा कवायत निर्देशक निलेश मंगळुरकर यांनी जमाव नियंत्रणा बाबत माहिती देवुन अधिकारी कर्मचारी याचे कडे ढाल, लाठी गॅस गण, अश्रुधुर सेल व एस.एल.आर रायफल देण्यात आले. जख्मीना नेण्यासाठी चौघेजन असे कर्मचारी नेमुन त्यांना जमान नियंत्रण प्रात्यक्षीक देण्यात आले. प्रात्यक्षीक दरम्यान दोन हॅन्ड ग्रेनेड प्रत्यक्षात उडवुन खर्च करण्यात आला. वरीष्ठांच्या मार्गदर्शना प्रमाणे जमाव नियंत्रण प्रात्यक्षीक घेण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم