जिल्ह्यात खून, दरोड्यांची मालिका संपताच चिखलीकरांचे लक्ष चोरट्याकडे !
महाराष्ट्र 24न्यूज
शंकर धुमाळ
नांदेड : गेल्या वर्षभरात जिल्ह्यात खून, दरोड्याची मालिका सातत्याने चालू होती. यामुळे संपूर्ण पोलीस विभाग खडबडून जागे होत तात्काळ कारवाई केल्यामुळे आजघडीला खून, दरोड्याची मालिका जवळपास संपत आल्याची लक्षणे दिसत असतानाच जिल्ह्यात चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलीस अधीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष वेधले आहे. सोमवारी सकाळी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास केलेले एकूण १० दुचाकीसह जबरीचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सोबत पाच मोबाईलही जप्त केले असून चार आरोपींनाही ताब्यात घेत त्यांच्याकडून ६ लाख ९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक गुन्हे आणि तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर
यांच्या पथकाने दुचाकीसह मोबाईल चोरी करणारी चौघांची टोळी पकडली आहे.
शहरात दि. २९ ऑगस्ट रोजी पहाटे आरोपी सय्यद इम्रान स.चांद (वय १९, रा. शिवनगर), विश्वास परमेश्वर शिंदे (वय १९, रा. नाथनगर), महेश वालाजी मुंडे (वय १९, रा. शिवनगर) व एका
विधिसंघर्ष चालक अशा चौघांना दुचाकीचे स्पेअर पार्ट खुले करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या चौघांनाही ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत जबरी चोरीसह दुचाकी चोरीचे १० गुन्हे उघड झाले आहेत. या कारवाईत नव दुचाकी, पाच मोबाईल असा एकूण सहा लाख ९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून
पुढील तपासासाठी आरोपीना विमानतळ पोलिसांच्या ताव्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने व पोउपनि दत्तात्रय काळे, जसवंतसिंग शाहू, पोहेकॉ सुरेश घुगे, मारोती तेलंग, संग्राम केंद्रे, पोना अफजल पठाण, रुपेश दासरवार, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, पोकॉ बालाजी येळगे, मोतीराम पवार, बालाजी यादगिरवाड़, महेश वडगु, मयोना किरण वावर, चालक पोना अर्जून यांनी सहाभाग घेतला होता
إرسال تعليق