हिंगोलीत २४ ऑगस्टला जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा

हिंगोलीत २४ ऑगस्टला जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्र 24न्यूज
23 ऑगस्ट 2022

हिंगोली : २१ व्या हिंगोली जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेचा २४ ऑगस्टला समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

श्री संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सायंकाळी ५ वाजता समारोपीय समारंभात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ चे समादेशक संदीपसिंह गिल्ल यांच्या उपस्थितीत समारोपीय सोहळा पार पडणार आहे. 
यावेळी सायंकाळी ५.१० वाजता प्रमुख पाहुण्यांचे आगमन होणार आहे..
५.१३ वाजता फनफेअर (मानवंदना), ५.१५ वाजता महिलांचे शंभर मीटर धावणे, ५,२५ वाजता पुरूषांची शंभर मीटर धावणे अंतीम, ५.४० वाजता मानवंदना व संचलन, ५.५५ वाजता बक्षिस वितरण सोहळा यानंतर मान्यवरांचे मनोगत, त्यानंतर ६.३३ वाजता रिट्रीट व ६ वाजता ध्वज हस्तांतरण आणि ६.४० वाजता मिंगलिंग पार पडणार आहे. कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم