ट्रँक्टर चोरीतील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी काही तासात ठोकल्या बेड्या

ट्रँक्टर चोरीतील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी काही तासात ठोकल्या बेड्या

डिग्रस कऱ्हाळे येथील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेल्यामुळे गावात वाहन मालक वाहने कुठे ठेवावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीतील डिग्रस कऱ्हाळे येथील एका शेतकऱ्याचे ट्रँक्टर चोरीला गेल्याची घटना 20 आँगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी शेतकरी विजय गोविंदराव कऱ्हाळे यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे व  डिग्रस बिट चे कर्तव्यदक्ष जमादार संतोष वाठोरे यांनी तपास करीत आवघ्या काही तासात चोरी गेलेले ट्रँक्टर ट्रॉली  दहा  लाख रुपये किंमतीचे वाशीम येथुन जप्त करण्यात आले. व आरोपी दिपक बाजीराव कऱ्हाळे याला अटक करण्यात आली असुन त्याला न्यायालयासमोर हजर केले असता. दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत


Post a Comment

أحدث أقدم