हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 45 सदस्य निवडून आणणार -शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी घेतली शपथ



हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 45 सदस्य निवडून आणणार -शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे  यांनी घेतली शपथ

हिंगोली (प्रतिनिधी)  -  हिंगोली येथे बारा सप्टेंबर रोजी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी हिंगोली विश्रामगृहात शिवसेना जिल्हा प्रमुख विनायक भिसे पाटील यांच्या नेतृत्वात  शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा प्रमुख संदेश देशमुख,जिल्हा सहसंपर्क प्रमुख गोपु पाटील,जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,माजी आमदार संतोष टार्फे, अजित मगर, माजी सहसंपर्क प्रमुख पी डी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीला जिल्हा भरातून शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली.
12 सप्टेंबर रोजी खासदार विनायक राऊत हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असून जिल्ह्यात शिवसेनेची पुढची दिशा ठरवून शिवसेना कशी बळकट करता येईल याबाबत शिवसैनिकांना विनायक राऊत व बबनराव थोरात  मार्गदर्शन करणार आहे.
बैठकीत बोलताना 
*शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक  पाटील* यांनी सांगितले की मला जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देत मा. उद्धव साहेब ठाकरे यांनी जो विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थक करणार आहे आणि त्याचा परतावा म्हणून मी मा. उद्धव  ठाकरे यांना हिंगोली जिल्हा परिषदेत 45 शिवसेना सदस्य निवडून आणून एक उपहार भेट देणार आहे अशा प्रकारची शपथ विनायक भिसे पाटील यांनी स्वतः घेतली आणि उपस्थित त्यांना ही शपथ घ्यायला लावली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे हिंगोली  जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये एक नवीन उत्साह संचारला आहे आणि आपण शिवसेनेला उभारी देऊ आणि गद्दारांना जमिनीत गाढू अशी भावना शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत,.

Post a Comment

أحدث أقدم