इस्लामपुरात चोरट्याने घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत मंगळसूत्र रोख रक्कम पळविली

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
12 सप्टेंबर 2022

किनवट तालुक्यातील 
इस्लापूर येथे चोरट्यांनी घरात घुसून धारदार शस्त्राचा धाक दाखवून मंगळसूत्र व काही रोख रक्कम पळवली , पोलिसात गुन्हा दाखल.
करण्यात आला 
 इस्लापूर पोलीस ठाणे येथे काही अज्ञात व्यक्तींनी घराची खिडकी फोडून आत प्रवेश करून धारदार शस्त्राने धाक दाखवून महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र किंमत सुमारे पंधरा हजार रुपये व मुलांच्या गळ्यातील सोने असा ऐवज लंपास केला. प्रकाश माहूरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरीकडे बिअर शॉपी चे सेटर फोडून काही रोख रक्कम म्हणजे सात हजार रुपये आणि तीन पेटी बियरच्या बाटल्या चोरून नेण्यात आल्या. अशी माहिती अमोल बिअर शॉपी चे मालक गजानन कदम यांनी दिली यावेळी पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार तोंडेवाड हे करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم