जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 19 सप्टेंबर 2022


हिंगोली 
जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाकरीता आ.तान्हाजी मुटकुळे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असताना १८ सप्टेंबर रोजी नागपूर येथील वास्तू विशारद तांत्रिक • सल्लागार कंपनीच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. 


जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणा करीता नागपूर येथील वास्तू विशारद तांत्रिक सल्लागार कंपनीला हिंगोलीत भेट देऊन विकास आराखडा सादर करण्याच्या

सूचना दिल्याने कंपनीचे अधिकारी कल्याणकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, दिव्यांग आघाडी प्रदेश पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती. यावेळी नगर अभियंता रत्नाकर अड़शिरे, रविराज दरक यांनी पथकास नकाशा दाखवून सुशोभिकरणाबाबत माहिती दिली. नागपुरच्या पथकाने प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्यामुळे येत्या काही दिवसात लवकरच जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم