15 कोटी 75 लाख रुपये निधीतून मतदार संघात निर्माण होत असलेल्या सुनेगाव,पेनूर,पांगरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते संपन्न. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन राव हंबर्डे यांनी 15 कोटी 75 लाख रुपये निधीतून मतदार संघात पांगरी सुनेगाव पेनुर रस्त्याची अडचण लक्षात घेता ग्रामीण भागातील शेतकरी व नागरी यांच्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचा असलेला रस्ता व त्यांना होणाऱ्या त्रासामुळे हा रस्ता महत्त्वाचा आहे असे त्यांच्या निदर्शनास
आले असता मोहन राव हंबर्डे यांनी काल दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या मतदारसंघात होणाऱ्या गैरसोयीवर लक्ष ठेवून असलेले रस्त्याचे काम हाती घेतले व काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी त्यांनी या कामाचे भूमिपूजन केले. कामाचे भूमिपूजन झाले असता पेनुर सुनेगाव पांगरी येथील नागरिकांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांचे आभार मानले आहेत.
إرسال تعليق