*राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे 20 रोजी आंदोलन - धनंजय सूर्यवंशी*
राज्यातील भाजपच्या सरकारने राज्यात होऊ घातलेला महत्त्वकांक्षी प्रकल्प वेदांत ग्रुप उद्योग हा गुजरात कडे पळून नेला त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी दिली.
वेदांत ग्रुपचा उद्योग गुजरात मध्ये हलवल्यामुळे महाराष्ट्र मध्ये उपलब्ध होणारा रोजगार भाजपा सरकारने बुडवला आहे याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 1 .30वाजता महत्वाची बैठक आयोजित केली आहे या दोन्हीही कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील युवकच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी केले आहे
إرسال تعليق