शेतकऱ्याची रेल्वे समोर आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका मधील पाथरड रेल्वे गावातील बँकेच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने रेल्वेच्या समोर येऊन आत्महत्या करून घेतली.
पाथरड रेल्वे गावातील शेतकरी इसम  नामे प्रभू शंकरराव अवतीरक वय 50 वर्षे व्यवसाय शेती यांनी मागील दोन वर्षांपूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वजीराबाद नांदेड येथून अंदाजे एक लक्ष रुपयांचे कर्ज घेतले होते.
परंतु चालू वर्षातील अति पाऊस पडल्याने पिके वाया गेली त्यामुळे तो बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या मानसिक तणावात राहत होता. सदर मानसिक तणावात राहून शेतकरी प्रभू आवतीरक याने दिगंबर शंकर आवाज यांचे शेताजवळ पाथरड रेल्वे गावाचे शेत शिवारातील मुदखेड ते नांदेड जाणारी रेल्वे पटरी वर रेल्वेच्या समोर येऊन आत्महत्या करून घेतली आहे. वगैरेची त्याचा भाऊ बालाजी शंकर अवतीरक यांनी खबर दिले वरून पोलीस ठाणे बारड येथे अकस्मात मृत्यू क्रमांक 18/2022 कलम 174 सी आर पी सी प्रमाणे दाखल झाला आहे. सदर अकस्मात मृत्यूची पुढील चौकशी व तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष वानोळे हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم