*अंगणवाडी केंद्रांची धुर मुक्तीकडे वाटचाल 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात एकाच दिवसात 60 पेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना गॅस सिलिंडरचे वाटप.जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र धुर मुक्त करण्याचे श्री.संजय दैने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प हिंगोली यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली काम सुरू. जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र धुर मुक्त*
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय दैने यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली 100%अंगणवाडी केंद्राना धुर मुक्त करण्यासाठी त्यांना 15 व्या वित्त आयोगातील महिला बालकल्याण विभागासाठी राखीव 10%निधीतुन व ग्रामपंचायत स्व निधीतून गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात एकाच दिवसात 60 पेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. यामुळे गॅस सिलेंडर उपलब्ध झालेल्या अंगणवाडी केंद्रांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली असुन 2 ऑक्टोबर पर्यत 100%अंगणवाडी केंद्राना धुर मुक्त करण्याचा मानस आहे. या अभियानासाठी श्री.संजय दैने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली श्री. आत्माराम बोंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री गणेश वाघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटविकास अधिकारी श्री.तोटावर, श्री. बेले, श्री. गोरे, श्री.बोथीकर, श्री. बोंढारे यांनी नियोजन करून परिश्रम घेतले. जिल्हयातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व पर्यवेक्षिका व ग्रामसेवक यांनी जिल्हा 2 ऑक्टोबर पर्यत धुर मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.
إرسال تعليق