हिंगोलीचे नवे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 22 ऑक्टोंबर 2022
हिंगोली गुरुवारी निघालेल्या आदेशानुसार येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ चे समादेशक संदीप सिंह गिल यांची हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती पण शुक्रवारी दुपारी निघालेल्या आदेशानुसार हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून एम. राकेश कलासागर हेच काम पाहणार होते. तर शुक्रवारी संध्याकाळी निघालेल्या आदेशानुसार जी श्रीधर यांची हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गुरुवारी निघालेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची हिंगोली वरून बदली झाली होती पण त्यांना पदस्थापना मिळालेली नहोती मात्र त्यांच्या जागी हिंगोली एसआरपी चे समादेशक संदीप सिंह गिल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवार निघालेल्या आदेशानुसार हिंगोली एसआरपीचे समादेशक संदीप सिंह गिल यांची हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून झालेली बदली तूर्तास
जी श्रीधर हे तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम या छोट्याश्या गावातील आहेत. त्यांची पहिली पोस्ट खामगाव व नंतर औरंगाबाद ग्रामीण येथे एएसपी, नागपूर येथे डीसीपी व बीड येथे एसपी म्हणून त्यांनी काम केले आहे. बीडमध्ये असताना त्यांनी गुन्हेगारीला आळा घालून आपल्या कर्तव्याची छाप पाडली आहे. गुन्हे तपास उघड करण्यात जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पोलीस राज्यात पाचव्या क्रमांकावर होते तसेच त्यांनी राज्यातील पहिल्या सखी सेलची स्थापना त्यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक म्हणून अकोला येथेही त्यांनी काम केले आहे. कर्तव्य कठोर पोलीस अधीक्षक म्हणून यापूर्वीचा त्यांचा प्रवास राहिला आहे. आता त्यांची हिंगोली येथे बदली झाल्याने हिंगोली मध्ये सुद्धा याच पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा हिंगोलीकरांना आहे.
पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी
आतापर्यंत अनेक गावगुंडांना धडा शिकविला आहे
जिल्ह्यातील अवैध धंद्यावर लवकरच आळा घालणार
थांबविण्यात आली आहे. तर राकेश कलासागर पोलीस अधीक्षक हिंगोली हे पुढील आदेश येईपर्यंत हिंगोली याच ठिकाणी कार्यभार पाहतील असे आदेश निघाले होते. हे आदेश औटघटकेचे ठरले असून शुक्रवारी रात्री उशिरा निघालेल्या
नव्या आदेशानुसार पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले जी श्रीधर हिंगोली चे नवे पोलीस अधीक्षक असतील. एकंदरीतच हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक बदली प्रकरणावरून मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्याचे पहावयास मिळत असताना
नवीन पोलीस अधीक्षक श्रीधर यांची हिंगोली जिल्ह्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे
إرسال تعليق