दसरा महोत्सवात १५ हुल्लडबाजांवर पोलीसाची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क
हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात गर्दी होत असून महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर साध्या वेषातील पोलीस लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत १५ जणांना पोलिसांनी समज दिली आहे.
ऐतिहासिक दसरा महोत्सवात गर्दी वाढू लागली आहे. मागील दोन दिवसांत जवळपास 30 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी दसरा महोत्सवास भेट दिली आहे. महोत्सवाला होणारी गर्दी पाहता पोलिसांनी पथके नियुक्त केली आहेत. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस अधिकाऱ्यांनी प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी केली आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रदर्शनीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून फुटेजची दररोज तपासणी केली जात आहे. आतापर्यंत फुटेजमध्ये १५ जण छेडछाडीचा प्रयत्न करतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केले आहे
दसरा महोत्सवासह दुर्गादेवी मंडळ परिसरात दामिनी पथकाकडून रात्री उशिरापर्यंत गस्त घातली जात आहे. यात पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, नंदा धोंगडे, आरती साळवे, शारदा डेंबरे यांच्या पथकाने एकावर कारवाई केली आहे.
दामिनी पथकाकडून एकावर कारवाई करून
त्यांना समज दिली आहे. सायबर आढळून आल्यास अशांवर थेट गुन्हा पोलिसांच्या पथकासह, चिडीमार पथके दाखल करण्यात येणार असल्याची तैनात केली आहेत.
إرسال تعليق