डोसा खाल्याने ३५ नागरिकांना नागपुरात विषबाधा

डोसा खाल्याने ३५ नागरिकांना विषबाधा

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क

नागपूर : वाडी पोलिस स्टेशन हद्दीतील डॉ. आंबेडकरनगरमध्ये एकाचवेळी तब्बल ३५ नागरिकांना विषबाधा - झाल्याने शनिवारी सकाळी खळबळ उडाली. प्रकृती खालावलेल्यांना लगेच विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही नागरिकांना सुटी देण्यात आली असून, १५ नागरिकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री या भागात दोसा विक्रेता आला. अशोक चौक, रामजी चौक व पंचशील चौकात राहणाऱ्या काणेकर, लोणारे, तांगडे, मेश्राम, शेंडे, टेंभुर्णे, गायकवाड व लामसोंगे कुटुंबातील लहान मुलांसह ३५ सदस्यांनी त्याच्याकडील दोसा

खाल्ला. शनिवारी सकाळी अचानक काही जण उलटी करायला लागले, तर अन्य नागरिकांना ताप आला. एकाच वेळी परिसरातील ३५ जणांची प्रकृती खालावल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या अस्वस्थ झालेल्यांना लगेच विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. विवेक सक्सेना, डॉ. उराडे, डॉ. चैतन्य महल्ले यांच्यासह वैद्यकीय पथक डॉ. आंबेडकरनगरमध्ये पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रकृती खालावलेल्यांची विचारपूसही केली. या घटनेची नोंद घेत वाडी पोलिसांनी दोसा विक्रेत्याचा शोध. सुरू केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم