औंढा तहसील कार्यालया कडून नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना मदत

दिनांक.०४/१०/२०२२ रोजी तहशील कार्यालय औंढा नागनाथ येथे मौजे दुघाळा येथील विश्वनाथ दत्तराव फुलऊंबरकर,शिवाजी प्रल्हादराव पोले,राजू बाजीराव चिकाळकर या नागरिकांना प्रतेक ६०००/- रूपये अतिवृष्टी नुकसान भरपाई आर्थिक मदत देण्यात आली.औंढा (नागनाथ) तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुसळधार पावसात दुघाळा येथील विश्वनाथ दत्तराव फुलऊंबरकर,शिवाजी प्रल्हादराव पोले,राजू बाजीराव चिकाळकर या तीन नागरिकांची राहती घरे पडली होती.मुसळधार पावसामुळे या नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याची मोड तोड होऊन,गहू,तांदूळ,डाळी व इतर खाद्यपदार्थ पावसामुळे भिजल्याने अन्नधान्यासह संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले होते.अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची सरपंच सौ:मथुरा राजू पवार,तलाठी गुंजकर व गावातील नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनाम्याचे अहवाल तहशील कार्यालय औंढा नागनाथ येथे सादर केले होते.अतिवृष्टीमुळे राहत्या घरांची पडझड  झाल्यामुळे  नुकसान झालेल्या नागरिकांना अर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी सरपंच सौ:मथुरा राजू पवार,मनीषा राहुल दिपके,राहुल आन॔ता दिपके,राजू रावसाहेब पवार,विजय आनता दिपके यांनी दिनांक.२०/०७/२०२२ रोजी मा.तहसीलदार कृष्णा कानगुले  साहेब  तहशील कार्यालय औंढा नागनाथ यांच्याकडे निवेदनाद्वारे करून पाठपुरावा केला.अखेर पाठपुराव्याला यश आले असुन आज दिनांक.०४/१०/२०२२ रोजी तहशील कार्यालय औंढा नागनाथ येथे दुघाळा येथील विश्वनाथ दत्तराव फुलऊंबरकर,शिवाजी प्रल्हादराव पोले,राजू बाजीराव चिकाळकर या नागरिकांना नायब तहसीलदार एल.एस.लाखाडे मॅडम व सरपंच सौ:मथुरा राजू पवार यांच्या हस्ते चेक द्वारे प्रत्येकी ६००० /- रूपये अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात आली यावेळी तलाठी गुंजकर,मनीषा राहुल दिपके,राहुल आनता दिपके,राजू रावसाहेब पवार उपस्थित होते.
 

Post a Comment

أحدث أقدم