शासकीय नर्सींग महाविद्यालय ची जी.एन.एम. ची दुसरी बॅच यशस्वी

शासकीय नर्सींग महाविद्यालय ची जी.एन.एम. ची दुसरी बॅच यशस्वी

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क10 नोव्हेंबर 2022
हिंगोली येथील शासकीय नर्सींग महाविद्यालय येथील जी.एन.एम.ची दुसरी बॅच यशस्वी प्रशिक्षण घेतले. आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या शासकीय नर्सींग महाविद्यालय येथे दुसऱ्या बॅचने आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मंगेश टेहरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिपक मोरे ,  जिल्हा एड्स अधिकारी उध्दव कदम,  प्राचार्या कविता भालेराव, अधिसेविका  राठोड मॅडम, जोशी मॅडम, टापरे,  अॅड.ढवळे मॅडम, सरोज दांडेकर, बलखंडे सिस्टर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
शासकीय नर्सींग महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षीच्या जी.एन.एम बॅचने आपला तीन वर्षाचा प्रशिक्षणाचा कालावधी यशस्वी पूर्ण केला आहे. त्यामुळे दुसऱ्या बॅचला निरोप देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विभागाचे कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम यांची उस्मानाबाद येथे बदली झाली त्यानिमित्ताने त्यांचाही सत्कार करण्याचा आयोजन करण्यात आले होते. जी एन एम च्या विद्यार्थिनींनी  प्रशिक्षणाचा तीन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक मोरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.  महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाण व सन्मानचिन्ह देण्यात आले आहेत.  कार्यक्रमातच  महाविद्यालय या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या कविता भालेराव यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم