खा. राहूल गांधींची हिंगोलीच्या शिष्टमंडळासोबत सहकारावर चर्चा
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क10 नोव्हेंबर 2022
हिंगोली भारतजोडो यात्रेमध्ये
९ नोव्हेंबर बुधवार नर्सी नायगाव येथे खा.राहुल गांधी यांनी हिंगोलीच्या शिष्टमंडळासोबत सुमारे ३५ मिनीट चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष तथा माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, वसमतचे आमदार राजेश नवघरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आंबादास भोसले यांची उपस्थिती होती.
यावेळी राज्यातील सहकार क्षेत्रातील अडचणी व समस्या यावर चर्चा झाली. साखर संघ, दुध सहकारी संघ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज व त्यांच्यासमोरील अडचणी
विषयी
चर्चा झाली.
विशेषतः राज्यातील सहकारी साखर कारखान्यां समोरील ऊस गाळपाचे प्रश्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. राज्यात सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी काय उपाय योजना करणे अपेक्षीत आहे याची माहितीही त्यांनी जाणून घेतली. सुमारे ३५ मिनीट झालेल्या या चर्चेत सहकार हा एकमेव विषय होता.
साखर कारखान्यांमधून उत्पादीत झालेल्या साखरेचा दर, निर्यात धोरण याचीही माहिती घेतली. तसेच अर्बन बँकांचा नवीन कायदा, कायद्यातील तरतुदी, जीएसटी, इन्कम टॅक्स या विषयावर ही चर्चा करण्यात आली. मराठवाडयात विशेषतः महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी दुग्धोत्पादन कसे वाढेल आहे.
राज्यात दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी काय करता येईल तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या अडचणीबाबत खा. राहूल गांधी यांनी ९ नोव्हेंबर बुधवार रोजी नर्सी नायगाव (जि.नांदेड) येथे शिष्टमंडळा सोबत चर्चा केली.
त्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजे याची माहिती घेतली. तसेच साखर कारखानदारीच्या प्रश्ना संदर्भात सविस्तर टिप्पणी सादर करण्याबाबत खा. गांधी यांनी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर यांना सांगितले. दरम्यान, याबैठकीमुळे मराठवाड्य सहकार क्षेत्रासाठी केंद्रस्तरावरून प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात
إرسال تعليق