रेल्वे प्रश्नावर हिंगोलीकरांचा जनआक्रोश उफाळला
सोमवारपासून आंदोलन
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क3 नोव्हेंबर 2022
हिंगोली मार्गे असलेली जालना - छपरा एक्सप्रेस रेल्वे औरंगाबाद मार्गे वळविल्याने हिंगोलीकर आक्रमक झाले असून आज हिंगोली येथे आयोजित बैठकीत तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात सोमवारी सनदशीर मार्गाने जिल्हाधिकारी मार्फत रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे.
रेल्वे रुंदीकरणास १४ वर्ष लोटले असले तरी अजुनही हिंगोलीपासून मुंबई रेल्वे नियमित सुरू झालेली नाही. त्यातच हिंगोली मार्गे छपरा (बिहार) येथे जाणारी रेल्वेगाडी मंजुर झाली होती. परंतु हिंगोलीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. मोठ्या प्रयत्नांनी जालना - छपरा गाडी औरंगाबाद मार्गे वळविली असे जाहीर विधान प्रसार माध्यमांवर केले. यामुळे हिंगोली जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गुरुवारी गणेश इन हॉटेलच्या सभागृहात रेल्वे प्रश्नावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, पत्रकार व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक वसंत भट्ट यांनी करीत रेल्वेच्या प्रश्नाबाबत भुमिका मांडली. यानंतर व्यापारी महासंघाचे नंदकिशोर तोष्णीवाल, माजी आमदार गजानन घुगे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायकराव भिसे तसेच गोवर्धन विरवुँâवर, पंकज अग्रवाल यांनी रेल्वे प्रश्नावर सर्व सामान्य नागरिकांनी जागरुक होण्याचे आवाहन केले. यावेळी हिंगोली येथे मिटरगेज असताना ज्या गाड्या चालविल्या जात होत्या, त्या रेल्वेगाड्या देखील अद्याप नियमित झालेल्या नाहीत. काही गाड्या रद्द केलेल्या आहेत. रेल्वे रुंदीकरणानंतर हिंगोली स्थानकावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची सुविधा होईल, अशी अपेक्षा असताना सातत्याने रेल्वे प्रशासन हिंगोलीकरांच्या मागण्या डावलत आहे. अशा वेळी या न्याय मागण्यासाठी आक्रमक स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्णय झाला. या आंदोलनात पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकार्या मार्फत रेल्वे प्रशासनाला सोमवार ७ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही तर आगामी काळात रेल रोको आंदोलन, रस्ता रोको आंदोलन, हिंगोली जिल्हा बंद अशा स्वरूपाचे आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने मांडला. बैठकीत माजी नगरसेवक अनिल नेनवाणी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतिष महागावकर, विराट लोकमंचचे शेख नईम शेख लाल, मनसे जिल्हा प्रमुख बंडु कुटे, माजी नगरसेवक बिरजु यादव, सुभाष अपुर्वा आदींनी रेल्वे प्रश्ना संदर्भात आपली भूमिका मांडली.
यावेळी सुमित चौधरी, किशोर कवठे, सुधीर गरड, असेफ पठाण, उमेश जाधव, गजानन घोडे, अॅड. अर्चना जमदाडे, अॅड. पार्वती पाटील, अॅड. राजेंद्र अग्रवाल, बंडू कुटे, प्रा. भानुदास पवार, अॅड. अनिल तोष्णीवाल, खलील बेलदार, विठ्ठलराव घुगे, शामराव जगताप, जेठानंद नैनवानी, नोमान शेख नईम, अब्दुल सत्तार बागवान, सुदर्शन नानासाहेब कंदी, सुभाषचंद्र लदनिया, गोपालराव सरनाईक, मकरंद बांगर, रवींद्र सोनी, के.पी. विडोळकर, नजीबखॉं पठाण, इमरान खान पठाण, शेख जमील बागवान, सुरेशअप्पा सराफ, शेख तोफिक बागवान, शेख जुबेर मामू, भारत शिंदे, पवन राठी, प्रशांत सोनी, संजय साकळे, विश्वासराव नायक, गोविंद चव्हाण, ज्ञानेश्वर माखणे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष वसमत, कपिल पाटील महागावकर, नारायण खराटे, सचिन शिंदे, मारुती मुळे, गजानन हाके, पाटील , प्रकाश सोनी, राजेश अग्रवाल, चेतन अग्रवाल, राजेंद्र हलवाई, गणेश साहू, राजेंद्र हलवाई, गणेश पहिनकर, शिवराज सरनाईक, महेश राखोंडे, सुधाकर वाढवे उपस्थित होते.
إرسال تعليق