सतत गुन्हेगारी कृत्य करणा-या टोळीविरूध्द मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांची कडक कार्यवाही
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 3 नोव्हेंबर 2022
कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ०३ आरोपींना ०२ वर्षाकरीता केले हिंगोली
जिल्हयातुन हददपार
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणारे अवैध्द धंदे बाबत कडक भूमिका घेत मागील काही दिवसापासुन अवैध्द धंदे व सराईत गुन्हेगार तपासणी व प्रतिबंधक कार्यवाही यावर भर देत कार्यवाहीस सुरूवात केली असुन आज रोजी वसमत तालुक्यातील राहणारे सराईत गुन्हेगार १) सुदर्शन मोहन शिंदे वय ३५ वर्ष २) योगेश गुलाबसिंग पवार वय ३५ वर्ष ३) सचिन मोहन शिंदे वय ३० वर्ष सर्व रा. पळशी ता.वसमत यांचे विरूध्द हिंगोली जिल्हयातील पो.स्टे. वसमत, पो.स्टे. हटटा परभणी जिल्हयातील पो.स्टे. पुर्णा व नांदेड जिल्हयातील पो.स्टे. कंधार, पो.स्टे. उमरी इ. पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी, जबरी चोरी व शरीराविरूध्दच्या गंभीर गुन्हयांची नोंद असुन नमुद तिन्ही आरोपी है सतत संघटीतपणे गुन्हे करतच आहेत व त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांचे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालींमुळे परीसरातील नागरीकांच्या जिवीतास तसेच संपत्तीस धोका उत्पन्न होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांनी सदर प्रकरणी कडम प्रतिबंधक कार्यवाही बाबत आदेश दिलेवरून पो.स्टे. हटटा येथील सपोनि बोराटे यांनी नमुद आरोपीतांविरूध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हददपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी सहा. पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांनी सविस्तर चौकशी करून नमुद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्हयातुन हृददपार करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांचेकडे शिफारस केल्यावरून नमुद प्रकरणी सविस्तर तपासणी करून मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये नमुद तिन्ही आरोपींना आज पासुन पुढील ०२ वर्षाकरीता हिंगोली जिल्हयातुन हददपार केले बाबत आदेश काढले आहेत. नमुद आरोपी हे तात्काळ हिंगोली जिल्हयातुन निघुन जातील तसेच मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे पुर्व परवानगी शिवाय हिंगोली जिल्हयाचे हददीत प्रवेश करणार नाहीत असे आदेशात नमुद केले आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री.जी.श्रीधर यांचे आदेशानुसार जिल्हयात दररोज स्थानिक गुन्हे शाखा व सर्वच पोलीस स्टेशन कडुन अवैध्द धंदे विरूध्द कडक कार्यवाही करण्यात येत असुन गुन्हेगारी रोकण्यासाठी प्रत्येक आठवडयात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात गुन्हेगारी वस्ती व संवेदनशिल ठिकाणी व्यापक प्रमाणात कोम्बींग ऑपरेशनही राबविण्यात येणार आहे. तसेच जेलमधुन रेंजवर आलेले व परत जेलमध्ये परत न गेलेले तसेच हददपार आदेश होवुनही त्याच भागात राहणारे इसमांविरूध्दही पोलीसांकडुन नियमित तपासणी करून कार्यवाही करण्यात येणार आहे.
إرسال تعليق