तीन मोटारसायकलवर ७८ हजाराचा दंडवाहतूक पोलिसांची कारवाई

तीन मोटारसायकलवर ७८ हजाराचा दंड
वाहतूक पोलिसांची कारवाई 

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 3 नोव्हेंबर 2022

हिंगोली शहरात कर्कश आवाज व सायरनवर दुचाकी पळविणाऱ्या तिघांना ७८ हजार ५०० रूपयाचा दंड आकारून मोटारसायकली जप्त केल्याची कारवाई वाहतूक शाखा व आरटीओ विभागाने केली आहे.

२ नोव्हेंबर बुधवार रोजी हिंगोली शहरांमध्ये कर्णकर्कष्य आवाज तसेच सायरण लावून लोकांना त्रास होईल अशा उद्देशाने रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या एकूण तीन मोटर सायकल त्यामध्ये एक बुलेट आर एक्स - १०० आणि टीव्हीएस विक्टर अशा मोटरसायकलला
यांच्याकडून एकूण ७८ हजार ५०० रुपये दंड आकारून सदरच्या

मोटरसायकल डिटेन करण्यात आले आहेत. सदरची कारवाई आरटीओ व शहर वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सय्यद सोबत पोलीस हवालदार शेषराव राठोड, किरण चव्हाण, रवी गंगावणे, गजानन राठोड, रुपेश धाबे चालक प्रवीण राठोड अशी संयुक्त कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखा हिंगोली तर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या मोटरसायकलला कोणतेही प्रकारचे इंटरफेअर करू नये, पोलीस सायरन हॉर्न व बुलेटची सायलेन्सर कोणीही 'त्यात बदल करू नये जेणेकरून दंडात्मक कारवाईला समोर जावे लागेल.

Post a Comment

أحدث أقدم