नांदेड मनपाचे तत्कालीन अपर आयुक्त राम गगराणी पत्नी, मुलासह लाचलुचपतच्या जाळ्यात २९ लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळली

नांदेड मनपाचे तत्कालीन अपर आयुक्त राम गगराणी पत्नी, मुलासह लाचलुचपतच्या जाळ्यात २९ लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळली

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 5 नोव्हेंबर 2022

नांदेड महानगरपालिकेचे तत्कालीन अपर गगराणी यांच्याकडे २८ लाख ७२ हजार ३६० रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ नोव्हेंबर रोजी त्यांना पुणे येथून पत्नी व • मुलासह ताब्यात घेतले आहे.

नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे तत्कालीन अपर आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्या मालमत्तेची उघड चौकशी केली. 
या उघडचौकशीअंती रामनारायण गगराणी यांनी १ मार्च २०१० ते ३० जून २०१६ या शासकीय सेवेच्या कालावधीत लोकसेवक पद धारण केले असताना कायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या आर्थिक उत्पन्नाच्या • तुलनेत त्यांच्याकडे अधिक मालमत्ता आढळली. या अधिकच्या "मालमत्तेविषयी ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ४५ टक्के अधिक म्हणजे २८ लाख ७२ हजार ६६० रुपयांची बेहिशेबी मालमत्ता त्यांनी संपादित केल्याचे या उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाले.

 विशेष म्हणजे, 
गगराणी हिंगोलीतून झाले होते सेवानिवृत्त

आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण रामनारायण गगराणी यांनी त्यांच्या सेवाकाळात नांदेडात उपविभागीय अधिकारी तसेच नादेड महापालिकेत अपर आयुक्त म्हणून काम पाहिले.

• हिंगोली येथून ते अडीच वर्षांपूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्यावरील कारवाईमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रामनारायण गगराणी यांना प्रोत्साहन देऊन सहकार्य केल्याचा ठपका एसीबीने ठेवला आहे.

या प्रकरणात एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन अपर आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी, जयश्री रामनारायण गगराणी, प्रथमेश रामनारायण गगराणी यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक धर्मसिंग पुढील तपास करत आहेत 
न्यायालय मध्ये हजर केले असता त्यांना तीन दिवसाचे पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे 

या मोठ्या कार्यामुळे महाराष्ट्र मध्ये  अधिकाऱ्यांमध्ये  खळबळ उडाल्याचे दिसून आले

Post a Comment

أحدث أقدم