हिंदुत्वाची कास धरून वीरशैव समाजाने संघटीत व्हावे-रामदास पाटील सुमठाणकर
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क5 नोव्हेंबर 2022
हिंगोली श्री.ष. ब्र.१०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा तर नेतृत्व श्री.ष. ब्र.१०८ वेदांतचार्य दिगम्बर शिवाचार्य महाराज, थोरलामठ वसमत यांच्या सानिध्यात ७ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता, कपिलधार क्षेत्राच्या शिवाचार्य महाराज वरच्या भागात भक्तांना ज्ञानप्राप्ती करिता धर्मसभा आयोजित केली आहे. या धर्मसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेतृत्व समाजभूषण रामदास पाटील सुमठाणकर यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून श्रीक्षेत्र कपिलधार येथे शिवयोगी श्री संत
शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीचे पावन दर्शनासाठी महाराष्ट्र आंध्रप्रदेश तेलंगणा व कर्नाटक होऊन लाखो भाविक येतात. राष्ट्रसंत वसुंधरारत्न श्री ष. ब्र.१०८ डॉ. शिवलिंग
अहमदपूरकर यांच्या आशीर्वादाने श्रीक्षेत्र महाक्षेत्रामध्ये प्रतिवर्षी धर्मसभा आयोजित करण्यात येते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री १०८ ष. ब्र. वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि
कपिलधार
उपाध्याक्ष श्री.ष.ब्र.१०८ डॉ. विरुपाक्ष' शिवाचार्य महाराज मन्मथधाम संस्थान मांजरसुंबा आणि सर्व शिवाचार्यांच्या संमतीने व सहकार्याने या धर्मसभेचे मार्गदर्शक श्री.ष. ब्र.१०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा तर नेतृत्व श्री.ष. ब्र.१०८ वेदांतचार्य दिगम्बर शिवाचार्य महाराज, थोरलामठ वसमत यांच्या सानिध्यात ७ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता, कपिलधार क्षेत्राच्या वरच्या भागात भक्तांना ज्ञानप्राप्ती करिता धर्मसभा आयोजित केली आहे.
विविध राज्यातील अनेक शिवाचार्य गण यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत उपदेश आशीर्वचन होणार आहे. यावेळी युवा नेतृत्व समाजभूषण रामदास पाटील सुमठाणकर हे अगामी काळातील 'समाजाच्या प्रगतीची दिशा आणि शासन स्तरावरील विकास, पाठपुरावा वाटचालीबद्दल' उपस्थित राहून भूमिका मांडणी करणार आहेत. समाजातील तरुण, युवा वर्ग आणि समाज बांधव सदभक्त यांनी समाजाच्या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेतृत्व समाजभूषण रामदास पाटील सुमठाणकर केले आहे.
إرسال تعليق