स्थानिक गुन्हे शाखेची अवैध्द गुटखा तंबाखु व विदेशी दारू वर मोठी कार्यवाही प्रतिबंधीत गुटखा तंबाखु चा ३८,३४० रू. चा तर विदेशी दारू रु. व मोटार सायकल असे ७६, ५६० रू. असा एकूण १,१४,९०० रू. चा मुददेमाल जप्त
मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली श्री. जी श्रीधर यांचे आदेशाने हिंगोली जिल्हयातील स्थानिक गुन्हे शाखा व सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध्द धंदे व सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द विशेष मोहीम सुरू असुन दिनांक 03/11/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून पो.स्टे. हिंगोली शहर हददीत तबेला परीसरातील इनायतखों इस्माईल खॉ पठाण यांचे दुकाणात छापा टाकला असता सदर ठिकाणी शासनाने प्रतिबंधीत केलेली व माणवी शरीरास हाणीकारक असे विमल, रजनीगंधा, व्ही-1 टॅबॅको, प्रियीयम आर.एम.डी व ईतर असा गुटखा, तंबाखु पान मसाला मिळुन आल्याने सहा. पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांचे तकारी वरून नमुद दुकानदार व त्याचा मुलगा विधीसंघर्षग्रस्त बालक व नांदेड येथील गोल्डन जर्दा चा दुकाण मालक यांचे विरूध्द पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुरनं. 439 / 2022 कलम 328,272,273,188 भादवी सह कलम 26 ( 2 ) (i). 26(2)(iv). 27(2)(e), 30(2) (अ). 59 अन्न सुरक्षा अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या कार्यवाहीत पो.स्टे. हिंगोली शहर हददीतील प्रभुदास स्वीट मार्ट दुकाणा समोर नामे- भैयालाल जमनलाल जैस्वाल रा. तोफखाना हा अवैध्दरित्या विक्री करीता स्वतःचे मोटार सायकलवर विदेशी दारू ज्यात मॅकडॉल नं.1 च्या 96 बॉटल, रॉयल स्टैग च्या 48 बॉटल, इम्पीरीयल ब्लू च्या 48 बॉटल असे एकुण 16.560 रू. चा मुददेमाल घेवुन जात असतांना मिळुन आल्याने नमुद विदेशी दारू मुददेमाल व मोटार सायकल किं. 60,000 असा एकुण 76,560 रू. चा मुददेमाल जप्त करून सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार यांचे तक्रारी वरून पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुरनं. 440 / 2022 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. उदय खंडेराय, सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि. राजेश मलपिलू, पोलीस अंमलदार सुनिल अंभोरे, नितीन गोरे, राजुसिंग ठाकुर ज्ञानेश्वर सावळे, विठठल काळे, किशोर सावंत, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, सुमित टाले, म.पो.अं. रविना घुमनर यांनी केली.
إرسال تعليق