हिंगोलीत दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाची अवैध्दरित्या विक्री करीता जाणा-या देशी दारूवर धडक कार्यवाही
मा.पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन अवैध्द दारू देशी व विदेशी, हातभटटी याविरोधात कार्यवाही करीता विशेष मोहीम सुरू असुन आज रोजी दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने पेट्रोलींग दरम्याण पो.स्टे. हिंगोली ग्रामीण हददीतील खांबाळा गावाजवळ रोडवर एका स्कुटीवर अवैध्दरित्या विक्री करीता घेवुन जाणारे देशी दारू संत्रा भिंगारी च्या ०५ बॉक्स एकुण १८० एम.एल च्या २४० बॉटल किंमत १९,२०० रू. व स्कुटी किं. ३५,००० रू. असा एकुण ५४,२०० रू. जप्त करून इसम नामे- अरबाज सुभान पठाण वय १९ रा. तलाबकटटा हिंगोली याचे विरूध्द सपोनि राजेश मलपिलु यांचे तकारी वरून पो.स्टे. हिंगोली ग्रामीण येथे गुरनं. ३७४ / २०२२ कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.पोली अधीक्षक हिंगोली श्री. जी.श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार धनंजय पुजारी, अर्जुन पडघन, विजय घुगे, महेश बंडे यांनी केली.
إرسال تعليق