गुन्हेगारीवर आळा घालण्यास प्राधान्य
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 नोव्हेंबर 2022
हिंगोली : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर
नियंत्रण
मिळविण्यासाठी
गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए यासारख्या विशेष कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला.
जिल्ह्यात आवेद धंदे यापुढे चालू देणार नाही
जी श्रीधर यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती
पोलिस अधीक्षक कार्यालयातील संत नामदेव सभागृहात २४ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे
साध्या वेषातील पथक घालणार गस्त
हिंगोली शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्गाच्या ठिकाणी दामिनी पथकासह साध्या वेषातील पथकही गस्त घालणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहर व जिल्हा हद्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे आदींची उपस्थिती होती. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले, अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करूनदेखील काही जण गुन्हे करीत आहेत. अशांची नोंद घेऊन त्यांच्यावर हद्दपारीसारख्या
विशेष कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहेत. विविध गुन्ह्यांतील तपासाला गती यावी यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष रिवॉर्ड जारी केले आहेत. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही, असा इशाराही पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिला.
إرسال تعليق