हिंगोली पोलीसांची धडक कार्यवाही मा.न्यायालयाकडुन प्राप्त एकुण ६६ अटक वॉरंट मधील इसमांना पकडुन न्यायालयात हजर केले.
दिनांक २४/११/२०२२ रोजी मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनात जिल्हयात अजामीनपात्र, जामीनपात्र, पोटगी वारंट बजावणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली सदर मोहीमेत जिल्हयातील सर्व १३ ही पोलीस स्टेशन अंतर्गत प्रभारी अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष कामगीरी करीत मा.न्यायालयातुन अनेक वेळा समन्स निघुन तारखेवर हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत मा. न्यायालयाकडुन अटक वारॅट निघाले होते. असे एकुण ६६ अटक वारंट मधील इसमांना पकडुन मा.न्यायालया समक्ष हजर करण्यात आले तर एका पोटगी वारंट मधीलही आरोपीस पकडुन न्यायालयात हजर करण्यात आले. सदर मोहीमेत मा.न्यायालयाकडुन प्राप्त जामीनपात्र ५६ वारॅट ची बजावणी करण्यात आली.
إرسال تعليق