पुसद येथे १८ डिसेंबरला राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा मराठा समाजातील मुला-मुलींसाठी सुवर्ण संधी

पुसद येथे १८ डिसेंबरला राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा

मराठा समाजातील मुला-मुलींसाठी सुवर्ण संधी

हिंगोली /प्रतिनिधी

विदर्भातील पुसद येथे मराठा समाजातील उपवधू व उपवर यांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा २०२२ चे रविवारी दि.१८ डिसेंबर  रोजी शेषराव पाटील , जिनिग व प्रेसिंग  मैदानावर होणार आहे. यासाठी मराठा समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा युवा मंच, मराठा महिला मंडळ, मराठा समाज यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद ,उमरखेड, महागाव, दिग्रस येथील मराठा समाजाच्या वतीने रविवारी १८ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय उपवर, उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.  विदर्भा सह, मराठवाडा ,इतर विभागातील मराठा समाजातील मुला-मुलींना सुवर्ण संधी मिळाली आहे.

उपवधू , उपवरांच्या पालकांनी परिचय मेळाव्यासाठी १०० रुपये नोंदणी फिस भरावी लागेल, मेळाव्या निमित्य प्रसिद्ध होणाऱ्या सुचिसाठी उपवर, उपवधू यांची परिचय पत्रके पाच डिसेंबर अखेर पाठविण्यात यावे. त्यानंतर आलेली परिचय पत्रके सूची पुस्तिका मध्ये समाविष्ट केली जाणार नाहीत, याची नोंद पालकांनी घ्यावी. वधू वरांची माहिती पत्रक 
marathakunabipusad @gmail .com या ईमेल वर देखील पाठवता येईल. 

हिंगोलीतील उपवधू -वरांनी खंडेराव सरनाईक, शिवाजी ढोकर पाटील, विश्वनाथ गायकवाड, विनायक भिसे पाटील, पत्रकार कल्याण देशमुख  , श्यामराव सपाटे , डॉ. रमेश शिंदे, पप्पू चव्हाण, मारोती राऊत, विनोद  देशमुख, गोपाल बोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, मधुकर ढवळे, गजानन ढोणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन दीपक काळे ,शंकर गावंडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم