हिंगोलीत पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या अध्यक्षतेखाली
महिला दक्षता समितीची बैठक संपन्न
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
19 नोव्हेंबर 2022
हिंगोली जिल्ह्यातील सर्व महिला दक्षता समिती सदस्यांची पहिली बैठक नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यामध्ये सदस्यांच्या अनेक अडीअडचणी जाणून घेतल्या.
जिल्ह्यातील
पोलिस ठाणे स्तरावर महिला दक्षता सदस्यांची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आलेली आहे. त्याचा • अनुभव लक्षात घेता जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर
यांनी १८ नोव्हेंबर रोजी महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत सरकारी अभियोक्ता सविता. देशमुख, तालुकास्तरीय सदस्या ज्योती कोथळकर, मिरा कदम, डॉ. राधिका देशमुख, माजी प्राचार्या मंगला गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला सदस्यांनी काही अडीअडचणी मांडल्या असता त्याचे तात्काळ निराकरण केले जाईल, असे आश्वासन पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी दिले.
إرسال تعليق