हिंगोलीत बेकायदेशीररीत्या तलवार बाळगणा-यांविरूध्द दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही

हिंगोलीत बेकायदेशीररीत्या  तलवार बाळगणा-यांविरूध्द दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
19 नोव्हेंबर 2022

मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे आदेशाने हिंगोली जिल्हयात अवैध्द धंदे व बेकायदेशिर हत्यार बाळगणा-यां विरूध्द कार्यवाहीची “विशेष मोहिम राबवीण्यात येत असुन,

 दिनांक- १८/११/२०२२ रोजी दहशतवाद विरोधी शाखा येथील पथकास पेट्रोलींग दरम्याण मिळालेल्या माहीतीवरून पो.स्टे. हिंगोली ग्रामीण हद्दीतील मौ. उमरा वाबळे यागावातील हरीदास मुटकुळे हा त्याचे घरी बेकायदेशिररित्या धारदार हत्यार (तलवार) बाळगतांना मिळुन आल्याने त्यास सदर हत्यार तलवारसह ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द पो.स्टे. हिंगोली ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक  जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार शैलेश चौधरी, धनंजय पुजारी, अर्जुन पडघन, आझम प्यारेवाले, विजय घुगे सर्व दहशतवाद विरोधी शाखा यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم