हिंगोलीत स्वस्त धान्य घोटाळ्यात तत्कालीन तहसीलदारासह 20 जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
बुधवार 29मार्च2023
हिंगोलीच्या तहसील कार्यालयातील ३३ लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तत्कालीन तहसीलदारासह तीन अव्वल कारकून, १४ स्वस्त धान्य दुकानदारांवर बुधवारी पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप केले. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुमारे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे अतिरिक्त धान्य वाटप झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये हिंगोली तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचा समावेश होता. त्यानंतर पुरवठा विभागाने त्यांना नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार काही जणांनी धान्याची रक्कम भरणा केली आहे.
दरम्यान, यामध्ये ३३ लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.
यावरून आज पहाटे परिविक्षाधिन तहसीलदार हिमालय घोरपडे यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे, अव्वल कारकून कैलास वाघमारे, इम्रान पठाण, बी. बी. खडसे यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार पी. आर. गरड, ज्ञानेश्वर मस्के, विनोड आडे, एस. के. पठाण, डी. एम. शिंदे, मिलींद पडघन, गणाजी बेले, गोपाल तापडीया, डी. बी. चव्हाण, गजानन गडदे, गोविंदा मस्के, पतींगराव मस्के, तालुका खरेदी विक्री संघ दुकान चालकासह तीन महिला दुकानदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे, जमादार अशोक धामणे स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
إرسال تعليق