धान्य चोरी करणारी अंतरराज्य टोळीला हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
बुधवार 29 मार्च 2023
आ.बाळापुर
येथील शिवम आमाने रा.सराफा गल्ली यांच्या आमाने ट्रेडर्स कंपनी नावाचे भुसार मालाच्या दुकानाचे शटर तोडून नेलेला गुन्हयातील १२ क्विंटल हरभरा, ४० क्विंटल ३० किलो सोयाबीन एकुण किंमत २ लाख ५० हजार ५००रु. चा मुददेमाल जप्त करुन चोरी करणार्या अंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
आ. बाळापुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादी शिवम प्रभाकर आमाने रा.सराफागल्ली यांनी फिर्यादी दिली की, आ. बाळापुर रोडवरील आमाने ट्रेडर्स कंपनी नावाचे भुसार मालाचे दुकान दि.२१ मार्च रोजी सायंकाळी बंद करून गेले असता त्याच मध्यरात्री त्यांचे दुकानाचे शटर तोडुन १२ क्विंटल ६० किलो हरभरा कोणत्यातरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे तक्रार दिल्या वरून पोस्टे बाळापुर येथे गुन्हा दाखल केला होता. अशाच प्रकारे बाळापुर येथे दोन घटना घडल्या होत्या तसेच पोलीस स्टेशन कुरूंदा हददीतील कोठारी पाटी तेथे देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. यावरुन स्थागुशाचे सपोनी. गोपीनवार यांचे तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळाची पाहणी करून, तसेच गोपनीय बातमीदार यांचे मदतीने व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषन करून आरोपी नामे परमेश्वर उर्फ बाबु रामु गायकवाड रा.दुधडवाडी ता.हिमायतनगर जि.नांदेड, शिवमंगल पिता ईश्वरदिन मिश्रा बेरोंचा तहसील मंझनपुर जि.कॉसांबी राज्य उत्तर प्रदेश, माधव मसाजी पवार रा.वायपहना पोस्ट तामसा ता.हदगाव जि.नांदेड, शफातउल्लाह इस्तीयाक चौधरी उर्फ इरफान रा.रूस्तुमभाईची खोली सोनाळे गाव ता.भिंवडी जि.ठाणे मुळ रा.टोला हजीजोत ता.मुधुबनी जि.सिधार्थ नगर उत्तर प्रदेश, शेर मोहम्मद इकबालखान उर्फ शेख उर्फ शाहरूख रा.घर क ६५७ संजय नगर सोसायटी कॉलनी दिलशाद हॉटेल समोर नोरी हॉटेल जवळ शांती नगर भिंवडी जि.ठाणे मुळ रा.आझमगड उत्तर प्रदेश यांनी केल्याचे निष्पन्न केले. यातील आरोपी क्र.१ ते ३ हे नांदेड जिल्हयामध्ये दुधडवाडी ता.हिमायतनगर, वायपाना ता.हदगाव जि.नांदेड येथे असल्याचे माहीती वरून त्यांना तेथुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी
आखाडा बाळापुर येथे दोन वेळेस व कुरूंदा हददीत कोठारी फाटा येथे शटर फोडुन तिन धान्य दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.
सदर आरोपींकडुन पोलीसांनी गुन्हयातील १२ क्विंटल हरभरा, ४० क्विंटल ३० किलो सोयाबीन किंमती २ लाख ५० हजार ५००रु. चा मुददेमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीयांनी नांदेड, मुंबई, तेंलगणा मधील निर्मल, अदीलाबाद येथे देखील अशाच प्रकारचे गुन्हे यापुर्वी केलेले आहेत. हि कार्यवाही पोनि पंडित कच्छवे, सपोनी सुनिल गोपीनवार, पोलीस अंमलदार भगवान आडे, राजुसिंग ठाकुर, विठल काळे, सुमित टाले, आकाश टापरे, रोहीत मुदीराज, प्रमोद थोरात व तुषार ठाकरे स्था.गु.शा. हिंगोली यांचे पथकाने केली आहे.
إرسال تعليق