पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा डाव उधळला सराईत गुन्हेगार पोलिसाच्या जाळ्यात

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा  डाव उधळला
सराईत गुन्हेगार पोलिसाच्या जाळ्यात 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 शनिवार 25 मार्च 2023

हिंगोली शहरात गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढविली आहे. २३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दरोडेखोऱ्यांच्या टोळीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी सहा जणावर गुन्हा दाखल करून दरोड्याचे साहित्य जप्त केले.
स्थानिक  गुन्हे शाखेचे पोलीस
 निरीक्षक   पंडित  कचवे 
जिल्हा पोलीस अधीक्षक जी 'श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील गुन्हेगारीस प्रतिबंध घालण्याचा एक भाग म्हणून सतर्क रात्रगस्त ठेवलेली आहे. २३ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. घेवारे यांच्या नेतृत्वात पथक रात्रगस्त करीत असताना लिंबाळा मक्ता गावा नजीक एका ठिकाणी रेकॉर्डेवरील पाच ते सहा गुन्हेगार घातक शस्त्रासह दबा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
दरोडेखोराकडुन दोन सुऱ्यासह, दोरी, मिरची पुड केली जप्त
 अटक केलेल्या सहाजणामध्ये एकजण हद्दपारीतील आरोपी
पथकामध्ये विशेष कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक शिवबास घेवारे 

धरून बसलेले अवस्थेतील आढळले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या पथकावर मध्यरात्री झडप मारून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन धारदार सुरे तसेच मिरची पूड, दोरी असे साहित्य आढळून आले. तसेच त्यांची नावे संजय पंडित काळे, करण जिलान्या पवार, सुनील, बाबाराव काळे, मधुकर पंडित काळे, विजय किशन काळे सर्व रा. लिंबाळा, रामा जंगल्या चव्हाण रा. देवळा अशी आहेत. त्यापैकी संजय पंडित काळे व करण जिलान्या पवार हे मागील दीड वर्षापासून पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी हिंगोली जिल्ह्यांतून हद्दपार केले होते तरीसुद्धा

त्यांनी कसलीही परवानगी न घेता हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्या अनुषंगाने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वे सुद्धा कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर आरोपीवर यापूर्वीचे घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सदर आरोपीकडून दोन सुरे, दोरी, मिरची पूड इत्यादी साहित्य जप्त करून पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे पोलीस निरीक्षक घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم