हिंगोलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांची पहिल्यांदाच घडली पंचतारांकीत वारी खासदार हेमंत यांचा पुढाकाराने मसाले मंडळाच्यामाध्यमातून नवी मुंबईत विशेष चर्चासत्र संपन्न

हिंगोलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांची पहिल्यांदाच घडली पंचतारांकीत वारी  
खासदार हेमंत यांचा पुढाकाराने मसाले मंडळाच्यामाध्यमातून नवी मुंबईत विशेष चर्चासत्र संपन्न

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
26 मार्च 2023                                            
 हिंगोलीच्या हळदीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम सुरु झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच मुंबईमध्ये स्पाईस बोर्ड ( मसाले मंडळ ) व मा. बाळासाहेब ठाकरेहरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने बैठकीत सहभाग घेता आला. पहिल्यांदाच आयात - निर्यात खरेदीदार व शेतकऱ्यांची मसाले विक्रेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे वक्तव्य कृषी मुल्य आयोगाचे  माजी सदस्य पाशा पटेल यांनी येथे म्हटले. 
            खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने आणि मसाले मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २०० हळद उत्पादक शेतकरी आणि एक्स्पोर्टसयांची शुक्रवारी (दि.२४) नवी मुंबई येथील पंचतारांकीत हॉटेल कंट्री इन रेसिडेन्सी रॅडिसन येथे महाराष्ट्रातील मसाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या मसाला विक्रेता-खरेदीदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला हिंगोली जिल्ह्यातून ३० शेतकऱ्यांना पंचतारांकित हॉटेलची सफर घडवून आणली. या बैठकीस देशभरातील नामांकित आयात - निर्यातदार मसाले व्यापारी सहभागी झाले होते. या प्रसंगी पाशा पटेल बोलताना म्हणाले की,हिंगोली जिल्ह्याची ना उद्योग जिल्हा ओळख मिटविण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून होते आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु पिकवलेल्या अन्न धान्यात भेसळ न करता त्याची गुणवत्ता आणि मागणी वाढेल अशा पद्धतीने आपल्या उत्पादनास वेगळी ओळख निर्माण होईल या दृष्टीने शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले पाहिजे. अशी भावना त्यांनी व्यक्त करतानाच शेतकऱ्यांच्या मालाला मिळणाऱ्या भावामध्ये अडसर असणारी दलालांची साखळी मोडून टाकण्याचे काम खऱ्या अर्थाने खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर या कार्यक्रमात सहभागी हळद उत्पादक शेतकरी,व्यापारी व खरेदीदार यांना मार्गदर्शन करताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, कोणताहीब्रँड विकसित होण्यासाठी सातत्य चिकाटी मालाचा दर्जा आणि बाजारपेठेतील विश्वासहर्ता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. ही विश्वासहर्ता निर्माण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि भारतातील सर्वात मोठा उत्कृष्ट हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्यास सन्मान प्राप्त झाला आहे. त्यामुळे विना भेसळीची हळद,सेंद्रिय हळद असं आणि शुद्ध व गुणवत्ता असलेली हळद पिकविणारा जिल्हा हे नाव, ही ओळख आपण सर्वांनी कायम टिकवून ठेवायची आहे. हे सांगतानाच हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील कोच्या व हिंगोलीच्या वसमत येथील हळदीला येत्या काही महिन्यात जीआय मानांकन प्राप्त होणार असून हळदीचा ब्रँड विकसित  होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 
            तसेच उद्योग खात्याकडून लॉजिस्टिक पार्क ड्रायपोर्ट वक्लस्टरसाठी प्रयत्न केले जात आहेत. भेंडेगाव शिवारात ५०० एकर जमीन संपादित करण्याच्या दृष्टीने भूसुधार समिती पाहणी करून गेली असून, यानिमित्ताने वसमत परिसरात मोठ्या प्रमाणात अर्थकारण वाढणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले. याकार्यक्रमाच्या मागील भूमिका स्पष्ट करताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, शेतकरी राजा वर्षभर राबराब राबून शेतामध्ये जे काही पिकवतो तेवढेच पैसे दलाल केवळ व्यापारामध्ये कमवत असतात. तर अश्यावेळी थेट आयात - निर्यातदार शेतकऱ्यांची भेट व्हावी, म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या दोन दिवसात मुंबई बाजार समितीने घेतलेल्या विविध उपक्रमांची पाहणी, भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर येथील हाय रेडिएशन सेंटर,तसेच निर्यात करण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात आले. जगभरात हळद निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांना कश्या पद्धतीची हळद असावी,  त्याचे पृथकरण (सेग्रीगेशन) कश्याप्रकारे केले गेले पाहिजे. त्याच्यावरती किटकनाशकांची मात्रा कमी प्रमाणात असली पाहिजे असे खासदार हेमंत पाटील यांनी   महाराष्ट्र24 न्यूजला  बोलताना सांगितले

Post a Comment

أحدث أقدم