सोशल मीडीयावर अल्पवयीन मुलीचे फोटो टाकून छेडछाड केल्या प्रकरणातील दोन आरोपींला जामिन
मंजूर अॅड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 मार्च 2023
29जानेवारी 2023 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली (ग्रामीण) येथे 1. शेख उझेर पि. शेसख अश्रफ व 2. शेख वसीम अक्रम शेख पाशा यांच्यावर कलम 354 (A) 354 (D), 506,507, 34 भा.द.वी. व पोक्सो कलम अंतर्गत 12, 8 अन्वये गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये दोन्ही आरोपींना दि. 13/03/2023 रोजी पोलीसांनी अटक करुन ताब्यात घेतले होते.
त्यानंतर आरोपीच्या जमानतीसाठी वि. न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता वि. जिल्हा न्यायाधीश डी. जी. कांबळे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दि. 17/03/2023 रोजी 1. शेख उझेर व 2. शेख वसीम यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
आरोपीच्या वतीने अॅड. सतीश देशमुख, अॅड सौ. सुनीता देशमुख, अॅङ शामकांत देशमुख, अॅड प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना अॅड. शरद देशमूख अॅड आदीत ऊर्फ शुभम सतीश देशमूख. अँड आरीफ पठाण, अॅड राहूल देशमूख, अॅड विराज देशमुख, अॅड योगेश खिल्लारी (पाटील), अॅड रजत देशमुख, अॅड अविनाश राठोड, अॅड प्रकाश मगरे, ॲड मुददसीर अ. रहीम अॅड आनंद खिल्लारे, अॅड सुमीत सातव, अँड लखन पठाडे, अॅड जैस्वाल मॅडम अॅड आकाश चव्हाण, अॅड शुभम मुदीराज यांनी सहकार्य केले..
إرسال تعليق