हातभटटी दारू निर्मीती व विक्री करणा-या वर कळमनुरी पोलीसांची बेधडक कार्यवाहीत 18हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

हातभटटी दारू निर्मीती व विक्री करणा-या  कळमनुरी पोलीसांची कार्यवाही

मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयात लपुन छपुन चालणारे अवैध्द धंदे विरोधात विशेष मोहीम व कडक कार्यवाही सुरू असून सतत असे अवैध्द धंदयाचे गुन्हे करणा-या आरोपीं विरोधात प्रभावी प्रतिबंधक कार्यवाहीही केली जात आहे.

 २६मार्च २०२३ रोजी पोलीस स्टेशन कळमनुरी हददीत कळमनुरी शहरातील आठवडी बाजार गल्लीत व मौ. जटाळवाडी येथे कळमनुरी पोलीसांनी हातभटटी दारू तयार करणे व विकी करण्याच्या ठिकाणी छापा मारून दोन्ही ठिकाणावरून मिळुन २८,६०० रू. ची हातभटटी दारू जप्त केली असुन सदर ठिकाणी हातभटटी दारू बनविण्याकरीता वापरात येणारे साहीत्य व मिश्रण जागेवरच नष्ट केले. 
नमुद दोन्ही ठिकाणच्या कार्यवाही प्रकरणी संबधीत इसमांवर पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुरनं. १९०/२०२३ व गुरनं. १९१ / २०२३ कलम ६५ (ख) (ड) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, सहा.पोलीस निरीक्षक रेखा शहारे, पोउनि कृष्णा सोनुने, सफौ. अंभुरे पोलीस अंमलदार संजय राठोड, प्रशांत शिंदे यांनी केली

Post a Comment

أحدث أقدم