गोरेगाव व कडोळी येथे गुटखा व दारू कारवाईत
अवैध धंदे चालकाकडून 18 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
ठाणेदार रवी हुंडेकर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
सोमवार 27 मार्च 2023
हिंगोली : सध्या गुटख्यांसह अवैध दारूवर कारवाईचे सत्र सुरू असताना गोरेगाव व कडोळी येथे २६ मार्चला दोन ठिकाणी छापे मारून गुटखा जप्त करून गुन्हे दाखल केले.
पोलीस पथकाकडून
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शिवाणी किराणा दुकानामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर यांच्यासह पथकाने अचानक २६ मार्चला मारलेल्या छाप्यात सुनिल पांडुरंग घनतोडे यांच्याकडुन
५२५० रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला, ५ हजार रुपयांचा व्हीवन तंबाखु, ७२० रुपयांचा गोवा १ हजार असा एकूण ११६३० रुपयांचा गुटखा जप्त करून अनिल भारती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल पांडुरंग घनतोडे रा. केंद्रा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच प्रमाणे कडोळी येथील दोस्तांना हॉटेलच्या पाठीमागे अवैध गुटखा असल्याची माहिती मिळाल्याने गोविंद खांडेकर यांच्यासह पथकाने मारलेल्या
छाप्यात दोन हजार रुपयांच्या दारू मेक्डोवेल्स नंबर ०१, ओसीब्ल्यु, रॉयल स्टॉ या विदेशी दारूसह १४०० रुपयांच्या १४ देशीदारूच्या बाटल्या आणि दारू टँगो ओलका असा देशीविदेशी दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी गोरेगाव पोलीसात गोविंद खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन माधव माहुरकर रा. कडोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
यापुढे गोरेगाव परिसरामध्ये मटका जुगार अवैध धंदे चालकावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक हुंडेकर यांनी महाराष्ट्र24न्युजला बोलताना सांगितले
إرسال تعليق