हिंगोली जिल्ह्यात अवैध गुटख्यांवर पोलिसांचे तिन ठिकाणी छापे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
रविवार 26 मार्च 2023
हिंगोली शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा अवैधरित्या विक्रीसाठी आणला जात असल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे मारून गुन्हे दाखल केले.
जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रत्येक दिवशी अवैध गुटख्यांवर मोठ्या प्रमाणात छापे मारून अवैध गुटखा जप्त केला जात होता. मध्यंतरी काही प्रमाणात ही मोहिम थंडावलेली असताना आता पुन्हा एकदा नव्या जोमाने अवैध गुटख्यांवर छापे मारले जात आहेत. हट्टा शिवारातील हट्टा ते सावंगी रस्त्यावर अभिजीत मोरे यांच्या आखाड्याजवळ अवैध गुटखा असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह पथकाने २५ मार्च रोजी छापा मारला. ज्यामध्ये ७२०० रुपये केसरयुक्त गोवा १००० गुटख्याचे
३० पुडे, ५ हजार रुपयाचे प्रिमीअम राजनिवास सुगंधीत पानमसाला गुटखा १२९६ रुपयाचा प्रिमीअम एक्सल ०१ जापानी जर्दा असा एकुण १३४९६ रुपयाचा गुटखा जप्त करून हट्टा पोलिसात अंबादास लिंबाजी खाडे रा. हट्टा याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथील पानटपरीमध्ये प्रशांत शिंदे यांनी मारलेल्या छाप्यात १६४० रुपयाच्या राजनिवास, विमल पानमसाला, केसरयुक्त पानमसाला, सितार गुटखा जप्त करून कळमनुरी पोलिसात सतिष संतोष बलखंडे याच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु या छाप्यात पोसिलांना पाहुन पानटपरी चालकाने पलायन केले. २३ मार्च रोजी वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे विठ्ठल रुखमाई मंदिराच्या बाजुला अवैध गुटखा असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांना मिळाल्याने त्यांच्यासह मधील पथकाने छापा मारला असता ४६०८
रुपयाच्या प्रिमीअम राजनिवास रुपयाचे पाच कागदी बॉक्स मधील एम सेंटेंड टोबॅको असा एकुण प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला व तंबाखु जप्त करण्यात आला. या प्रकरणी कुरुंदा पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाई गोरक्षनाथ येथील दिपक तुकाराम खंदारे याच्यावर गुन्ह दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास बालाजी जोगदंड हे करीत
सुगंधीत पानमसाल्याचे २४ पुडे, ११५२ रुपयाचे प्रिमीअम एक्सल ३०२३८ रुपयाचा ०१ जाफरानी जर्दा तंबाखुचे २४ पुडे, ५५९० रुपयाचे ४३ केसरयुक्त वजीर गुटख्याचे पुडे, १३५०० रुपयाचे ५४ गोवा १००० गुटख्याचे पुडे, ११८८ रुपयाचे ६ केसरयुक्त विमल पानमसाल्यांचे सहा पुडे, २४०० रुपयाचे पाच कागदी बॉक्स प्रिमीअम आरएमडी पानमसाल्याचे पुडे आणि १८०० आहेत.
जिल्ह्यातील 13 पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत अवैध धंदे चालकावर तात्काळ कारवाई करा असे महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले
إرسال تعليق